Marathi Vangmay Mandal

मराठी वाड्मय मंडळ

स्थापना २००० - माजी मराठी विभागप्रमुख डॉ केशव मेश्राम सर यांच्या हस्ते मंडळाची स्थापना झाली.

उद्दिष्टे

  • विद्यार्थ्यांमधे भाषेविषयची गोडी वाढण्यासाठी.

  • विद्यार्थ्यामधे लेखन कौशल्य वाढवण्यासाठी.

  • लेखक-कलावंत यांची विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष भेट घडवण्यासाठी.

  • वेगवेगळे साहित्य प्रकार समजावून घेण्यासाठी.

सदस्य:

  • रंजिता वीरकर

  • डॉ. अनुपमा गावडे

  • शशिकांत माघाडे

  • प्रथम वर्ष, द्वितीय, तृतीय वर्ष मराठीचे सर्व विद्यार्थी

उपक्रम :

  • लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी निबंध स्पर्धा, शब्द कोडे सोडवा स्पर्धा आयोजित करणे.

  • वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी काव्य वाचन, कथा वाचन, नाट्य वाचन स्पर्धा आयोजित करणे.

  • आंतर-महाविद्यालयीन 'महाराष्ट्र दर्शन' नृत्य / नाट्य / काव्य / गायन स्पर्धा आयोजित करणे व त्यामार्फत एका साहित्यप्रकाराचा परिचय करून देणे व महाराष्ट्रीय लोक-नृत्य विद्यार्थ्यांसमोर ठेवणे व त्यांना प्रेरित करणे.

  • यंदा 'महाराष्ट्र दर्शन' तर्फे बोलीभाषा व म्हणींवर आधारित स्पर्धा घेण्यात आली.

  • उद्‌घाटन व बक्षीस समारंभाच्या निमित्त लेखक कवी यांची भेट घडवणे.

  • विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आखनीसाठी मार्गदर्शन करणे.

  • दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना वाचनालयातून पुस्तके वाचण्यासाठी देऊन त्यावर त्यांचा अभिप्राय मिळवणे.

  • बक्षीस रूपात पुस्तके देणे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन संघर्षावर आधारित 'व्हय मी सावित्रीबाई' नाट्यानुभव

भाईंदर येथील शंकर नारायण महाविद्यालयात मराठी भाषा व वाड्मय मंडळ आणि महिला विकास कक्ष यांच्या वतीने ' व्हय मी सावित्रीबाई ' हा नाट्यानुभव आयोजित केला होता. १३ ऑगस्ट ह्या आचार्य अत्रे यांच्याजन्मदिनी या नाट्यानुभवाचा शुभारंभ झाला.

'व्हय मी सावित्रीबाई' या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन जेष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे यांचे आहे. त्यांच्या शिष्या शुभांगी भुजबळ व शिल्पा साने यांनी ही 'सावित्रीबाई फुले ' उभी केली. सावित्रीबाईंच्या जीवनातील संघर्षमय प्रसंग, त्यांचे महात्मा फुल्यांच्या सोबत 'स्री' म्हणून विकसित होणे. शुभांगी भुजबळ व शिल्पा साने यांनी विद्यार्थ्यांसमोर उभे केले. शुभांगी व शिल्पा या अभिनय क्षेत्राशी गेल्या १०-१५ वर्षांपासून निगडित आहेत. सुषमा देशपांडे यांनी गेली ३० वर्ष साकारलेली एकपात्री सावित्री, त्या दोघींनी मिळून साकारली. आजही समाजात घडणाऱ्या स्त्रियांवरील अन्यायाच्या घटना सावित्रीला बोलते करण्यास, आपला जीवन संघर्षाची प्रेरक कथा सांगण्यास भाग पाडत आहेत. समाजात जेव्हा स्रीयांसाठी सन्मानाची, विकासाची, अन्यायरहित व्यवस्था उभी करेल तेव्हाच या सावित्रीला आपले मनोगत व्यक्त करणे थांबवावे लागेल असे मनोगत शिल्पा साने यांनी कार्यक्रमाच्या शेवटी मांडले.

ह्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव महेश म्हात्रे, प्राचार्य डॉ.विष्णू यादव, श्रीपत मोरे हे कार्यक्रमाच्या शुभारंभास शुभेच्छा देण्यास उपस्थित होते. तसेच अंधेरीचे भवन्स, विरारचे विवा व भाईंदरचे अभिनव या महाविद्यालयातील विद्यार्थी हा नाट्यानुभव पाहण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यानंतर क्षणभर स्तब्ध राहून सर्वांनी उभे राहून या सावित्रीबाईना मानवंदना दिली.

प्रा. रंजिता वीरकर                    

मराठी विभाग