News

 

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व्याख्यान दि. ३१ ऑगस्ट २०१८

महाविद्यालयाच्या रौप्या महोत्सवी वर्षात अनेक मान्यवरांना महाविद्यालयात निमंत्रित करण्यात येत आहे. या मालिकेतील एक भाग म्हणून विविध क्षेत्रात निरपेक्ष वृत्ती ने कार्यरत असलेल्या व्यक्तींशी सुसंवाद विद्यार्थ्यांशी घडावा, या हेतूने प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने याना आमंत्रित करण्यात आले होते. दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी डॉ. लहाने यांनी विद्यार्थ्यां समोर स्फुर्तीदायक व्याख्यान दिले. स्वानुभव कथन, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टिप्स, मोबाईल चा अतिवापर, जंकफूड, डोळ्यांची काळजी अशा विविध विषयांवर त्यांनी सुसंवाद साधला. निस्वार्थी सेवा आपल्याला यश कडे घेऊन जाईल. बुद्धिमत्तेपेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची असे मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.